रेल्वेचे तिकीट दर कमी : वैष्णव   

 

अपघातांचे प्रमाण ९० टक्के घटल्याचा दावा
 
नवी दिल्ली : पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतात रेल्वेचे तिकीट दर कमी आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी संसदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंदात सरकार आल्यानंतर रेल्वे सुरक्षेच्या दिशेने पावले टाकली आहे. त्यामुळेे   रेल्वे अपघातांचे प्रमाण ९० टक्के कमी झाल्याचे ते म्हणाले. 
 
मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदान द्यावे, या मागणीसाठी संसदेत चर्चा झाली. त्यावेळीं ते म्हणाले, माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या काळाची तुलना करता सध्या रेल्वे अपघाताचे प्रमाण ९० टक्के कमी झाले आहे. कोरोना संक्रमणाच्या संकटानंतर आता कुठे रेल्वे सावरत आहे. महाकुंभ मेळ्यावेळी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या विषयावर ते म्हणाले, घटनेनंतर रेल्वेने विविध पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत गर्दीवर नियंत्रणात आणणे, उत्सवात रेल्वेगाड्यांची संख्या वाढवणे आदींचा समावेश आहे  
 
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर  रेल्वे अपघातांचे प्रमाण ९० टक्के कमी झाले आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना अपघातांचे प्रमाण मोठे होते. त्यांच्या काळात एका वर्षात २३४ अपघात झाले. ४६४ रेल्वेगाड्या घसरल्या होत्या. एकंदरीत वर्षाला ७०० अपघात झाले. ममता बॅनर्जी यांच्या काळात १६५ अपघात झाले आणि २३० रेल्वेगाड्या घसरल्या. एकंदरीत वर्षाला ३९५ अपघात झाले होते. मल्किार्जुन खर्गे यांच्या काळात ११८ अपघात झाले आणि २६३ गाड्या घसरल्या होत्या. वर्षाला ३८१ अपघात झाले. कवच यंत्रणेमुळे अपघाताचे प्रमाणात घट झाली. १० हजार रेल्वेगाड्या आणि १५ हजार किलोमीटरपर्यंत सुरक्षा मिळाली आहे. पर्यायाने अपघात ३० झाले आणि ४३ गाड्या घसरल्या. एकंदरी अपघातांचे प्रमाण पूर्वीपेक्षा ८० ते ९० टक्के कमी झालें असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. 
 

Related Articles